Dhule medical collage 
महाराष्ट्र

धुळे जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाचे उद्‍घाटन

धुळे जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाचे उद्‍घाटन

साम टिव्ही ब्युरो

धुळे : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह कक्षाचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी केली. (dhule-news-dhule-medical-collage-opration-theater-collecter-jalaj-sharma)

जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह कक्षाचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते नुकतेच उद्‍घाटन झाले. धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचाराच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाचे निर्जंतुकीकरण करून त्यांचा अहवाल भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून मागविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक तथा भूलतज्ज्ञ डॉ. अश्विनी भामरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. गीतांजली सोनवणे, डॉ. अश्विनी गिऱ्हे आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन, खाटांची व्यवस्था करावी

जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प, बाह्यरुग्ण कक्ष, स्कॅनिंग यंत्रणा, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला बालरुग्ण विभागाची पाहणी केली. श्री. शर्मा म्हणाले, की जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून द्याव्यात. जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवश्यक ऑक्सिजन, खाटांची व्यवस्था करावी.

लवकरच मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भडांगे, अधीक्षक डॉ. भामरे, डॉ. शिंदे यांनी श्री. शर्मा यांना जिल्हा रुग्णालयात कार्यरत मनुष्यबळ, उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालयात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना सुरवात झाली असून, लवकरच मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शस्त्रक्रियागृह सहाय्यक अमोल जाधव, सचिन कुंभार, कविता सरदार, प्रतिभा घोडके आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

Gurukul Monitor POCSO Case: भयंकर! विद्यार्थ्याचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल; गुरुकुलात धक्कादायक प्रकार|VIDEO

Vande Bharat Train: रेल्वेचा कोच की हॉटेलचा रुम! वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Pune News : एवढी मुजोरी! बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत लाडक्या बहिणींसह उत्साहात साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT