crime news 
महाराष्ट्र

प्रियकराच्‍या मदतीने पतीला संपविले; पायाला दगड बांधून मृतदेह फेकला विहिरीत

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : सोनगीर (ता. धुळे) ते बाभळे (ता. शिंदखेडा) शिवारातील जुन्या मुंबई- आग्रा महामार्गालगत शेतविहिरीत ४६ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवारी (ता. ३) दुपारी आढळला. त्याचा पत्नीसह प्रियकराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिंदखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तपासचक्रे फिरवत अवघ्या पाच ते सहा तासांत गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले. (dhule-news-crime-news-Ended-the-husband-with-the-help-of-a-lover)

अनैतिक संबंधातून निंबा रुपला पाटील (वय ४६, रा. सोनगीर) यांचा खून झाला असून, या प्रकरणी त्यांची पत्नी अनिता व प्रियकर शरद शालिग्राम पाटील (वय ४१, रा. सोनगीर) पोलिसांच्या ताब्यात आहेत. निंबा पाटील, पत्नी अनिता व तीन मुलींसह सोनगीर येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास आहेत. पती निंबा चरित्र्यावर संशय घेत पत्नीला सतत मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून तिने प्रियकर शरद पाटील यास पती निंबा याला संपविण्यास सांगितले. त्यानुसार शरद याने २० ऑक्टोबरला रात्री निंबा यास दारू पाजून ठार करत विहिरीत फेकून दिले.

पतीच्‍या हरविल्‍याची तक्रार केली दाखल

दरम्यान, निंबा पाटील २१ ऑक्टोबरपासून कामाला जातो, असे सांगून घरातून निघाला. मात्र, बारा दिवस झाले तरी तो परतला नाही म्हणून हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होती. तत्पूर्वी ४ ऑक्टोबरला त्याच्या पत्नीने पती मारहाण करतो, अशी फिर्याद दिली होती.

पायाला दगड बांधून फेकले

संशयित शरद याने मृत निंबा याच्या हाताला ॲल्युमिनिअमची तार, पायाला दगडासह वायर बांधून विहिरीत फेकून दिले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत निंबा याचे कपडे काढून केवळ बनियन व अंडरपॅंट राहू दिली गेली. बाजारात ॲल्युमिनिअमची तार विकत मिळत नाही. ती कशी आली? यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. हा धागा पोलिसांना संशयितांपर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील भाबड, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी तपासचक्रे फिरवून गुन्ह्याची उकल केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

Video : ''कोणाला खुमखुमी असेल तर..'', राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT