महाराष्ट्र

संकट काळात ज्‍यांची मदत, आता त्‍यांच्‍यावरच ओढवली उपासमारी

‘गरज सरो वैद्य मरो’नुसार आरोग्य सेवकांना केले कार्यमुक्त; ओढवली उपासमारीची वेळ

भूषण अहिरे

धुळे : कोरोना महामारीत आरोग्‍य विभागाला मदत व्‍हावी याकरीता कंत्राटी पद्धतीने आरोग्‍य सेवकांची भरती केली होती. मात्र कोरोनाची लाट ओसरताच या आरोग्‍य सेवकांना ‘गरज सरो वैद्य मरो’ यानुसार कार्यमुक्‍त केले गेले. यामुळे या आरोग्‍य सेवकांवर उपासमारीची वेळ ओढविली आहे. (dhule-news-coronavirus-waves-contract-service-aarogya-sevak-no-contineu-service)

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने संपूर्ण राज्यात कहर केला. यावेळी आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसरत बघावयास मिळाली. अशावेळी कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्य विभागाला हातभार लागावा यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवकांची भरती राज्यात करण्यात आली. आरोग्य सेवकांकडून कोरोना रुग्णांची सर्व व्यवस्था त्याचबरोबर कोरोना रुग्णांची सर्व देखभाल करून घेण्यात आली. परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने व राज्य सरकारने सर्व कंत्राटी आरोग्य सेवकांना कार्यमुक्त केले.

घरच्या व्‍यक्‍तींपासूनही राहिले दूर

कोरोनाच्या संकट काळात आरोग्य सेवकांनी मनापासुन रुग्णांची सेवा केली. तसेच या आरोग्य सेवकांना कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत असताना कित्येक दिवस घरच्या व्यक्तींना देखील भेटणे मुश्कील झाले होते. कोरोना वॉर्डांत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांना घरच्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ नये; म्हणून कित्येक दिवस आपल्या मुला-बाळांना लांबूनच बघून समाधान मानावे लागत होते. अशी सर्व परिस्थिती हाताळल्यानंतर आता कोरोनाची परिस्थिती सावरल्याच लक्षात आल्यानंतर संबंधित प्रशासनाने "गरज सरो वैद्य मरो' अशी पद्धत अवलंबत या आरोग्य सेवकांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे आरोग्य सेवकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे.

सेवेत रूजू करण्याची मागणी

बेरोजगार झालेल्या या आरोग्य सेवकांनी अखेर जिल्हा प्रशासनाला याबाबतची आपली कैफियत निवेदनात नमूद करून आरोग्य सेवेत रुजू करण्याची मागणी केली आहे. यावर आता जिल्हा प्रशासन व राज्य सरकार काय निर्णय घेतात याकडे या आरोग्य सेवकांसह त्यांच्या कुटुंबियांच लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT