Rural Development Plan 
महाराष्ट्र

ग्रामीण विकास योजनांच्या उद्दिष्टाला धक्का

केंद्र सरकारकडून मिळणारा चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असो किंवा जिल्हा विकास योजनेचा निधी, यातून दोन वर्षांपासून कोरोनाच्या उपाययोजनांवर म्हणजे विकासेत्तर कामांसाठी निधी वळता केला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : ग्रामीण विकास समोर ठेवून सुरू झालेल्या केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा निधी संसर्गजन्य कोरोनावरील उपाययोजनांसाठी वळता केल्याने या ग्रामीण योजनांच्या उद्दिष्टालाच धक्का बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाचशेच्या वर ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली आहे. (dhule-news-corona-impact-Rural-Development-Plan-colaps)

केंद्र सरकारकडून मिळणारा चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असो किंवा जिल्हा विकास योजनेचा निधी, यातून दोन वर्षांपासून कोरोनाच्या उपाययोजनांवर म्हणजे विकासेत्तर कामांसाठी निधी वळता केला जात आहे. शिवाय आमदार निधीतूनही ५० लाख रुपये कोरोनासंबंधी वैद्यकीय उपकरणांसाठी खर्च करण्याची मुभा दिली आहे. या योजनांच्या निधीतून ग्रामविकासाची कामे केली जातात. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामीण विकास हा केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. सात लाखांपासून पुढे १५ लाखांपर्यंत साधारणपणे लहान किंवा मध्यम लोकसंख्येच्या गावांना निधी दिला जातो.

निधी वळती करण्याची सूचना

ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार तो खर्च करावा लागतो. धुळे जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींच्या अखत्यारित ६८१ मोठी गावे आहेत. दोन वर्षांपासून आराखड्याबाहेर जाऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींना हा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यास सांगितले. जिल्हा विकास निधीतूनही ३० टक्के रक्कम वळती केली जात आहे. आमदारांच्या विकासनिधीत दोन वर्षांत दुप्पट वाढ केली असली तरी त्यांनाही ५० लाख रुपये कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याचे बंधन घातले आहे. कोरोनावरील नियंत्रण महत्त्वाचे असले तरी ग्रामविकासही तितकाच आवश्यक आहे. दोन वर्षांपासून शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या विविध योजनांचा निधी कोरोना उपाययोजनेच्या नावाखाली वळता केला जात आहे. वित्त आयोगाचा निधी तर केंद्राचा असला तरी तो घेतला जात आहे. या निधीतून यंदा विजेची देयके भरण्यास सांगितले आहे. मग विकास करायचा कसा, असा प्रश्‍न ग्रामपंचायतींपुढे आहे.

ग्रामपंचायतनिहाय गावांची संख्या

तालुका ........ ग्रामपंचायत ......... गावे

धुळे ............ १४१ ........... १६८

साक्री ........... १६९ ........... २२५

शिरपूर .......... ११८ .......... १४७

शिंदखेडा ........ १२४ .......... १४१

एकूण ............ ५५२ .......... ६८१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT