Dondaicha BJP News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्‍ये प्रवेश

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्‍ये प्रवेश

भूषण अहिरे

धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे काँग्रेसला भाजपने दणका दिला आहे. तीन नगरसेवकांसह जवळपास 200 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. (Dhule BJP Congress News)

दोंडाईचा (Dondaicha) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे सर्वच पक्षांतर्फे मोट बांधणी केली जात आहे. असे असतानाच (Congress) काँग्रेसचे तीन नगरसेवक व 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे.

भाजपचे वर्चस्‍व

यापूर्वी दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व बघायला मिळाले आहे, या निवडणुकीमध्ये देखील भाजपतर्फे पुन्हा एकदा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT