Cold Wave saam tv
महाराष्ट्र

Cold Wave: थंडीची लाट कायम; धुळ्यात पारा ७ अंशावर

थंडीची लाट कायम; धुळ्यात पारा ७ अंशावर

भूषण अहिरे

धुळे : मागील काही दिवसांपासून राज्‍यात थंडीची लाट कायम राहिली आहे. आता देखील काही दिवस थंडी कायम राहणार असल्‍याचा इशारा हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. यात राज्‍यात सर्वात निच्‍चांकी तापमानाची नोंद झालेल्‍या धुळ्यात (Dhule) थंडीचा कडाखा कायम असून आजही धुळ्यात ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (dhule news Cold wave continue Mercury in Dhule at 7 degrees)

धुळ्यात थंडीचा कडाखा (Cold wave) अद्यापही कायम आहे. किमान व कमाल तापमाना मोठी घट झाल्‍याने रात्री व पहाटेच्‍यावेळी थंडी जाणवत आहे. तीन– चार दिवसांपुर्वी थंडी गायब होवून वातावरणात थोडी उष्‍णता जाणवत होती. मात्र दोन दिवसांपुर्वी पडलेल्‍या धुक्‍यामुळे थंडीची लाट परत आल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे आणखी काही दिवस तरी थंडी कायम राहणार असल्‍याचा इशारा दिला आहे.

पंधरा दिवसांपासून दहा अंशाखाली

आज धुळ्यात ७ अंश सेल्‍सीअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धुळ्यात तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा कमी नोंदविण्यात येत असून धुळेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेतांना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT