महाराष्ट्र

धुळ्यात सराफ व्‍यावसायिकांचा बंद

धुळ्यात सराफ व्‍यावसायिकांचा बंद

भूषण अहिरे

धुळे : हॉलमार्किंगच्या चुकीच्या कारभार विरोधात सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्‍यानुसार धुळ्यात देखील सराफ व्‍यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून हॉलमार्किंगचा विरोध केला. (dhule-news-Closure-of-goldsmiths-in-Dhule-on-hallmark)

देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजले आहेत. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीने हाकला जात असल्याचा आरोप लावत सराफा व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज धुळे शहरातील सराफ व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात आला आहे.

तोडगा काढण्याची मागणी

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. ही सक्ती अन्यायकारक असून, त्यामुळे सराफ व्यवसाय धोक्यात येईल, असे सराफ संघटनांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या सक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी आज धुळे शहरातील सर्व सराफ व्यावसायिकानी दुकाने, व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सराफा व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांना सतत काळी मेहंदी लावल्याने काय नुकसान होते? जाणून घ्या

Bodycon Dresses Type: न्यू ईयरला 'हे' ट्रेंडी बॉडीकॉन ड्रेस नक्की ट्राय करा, दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Live News Update: पुण्यातील गोडाऊनमधून ६८ लाख रुपयांचे बिस्किट, साबण आणि सिगारेट चोरीला

Pickle Facts: जेवणात लोणचं खाणं पडेल महागात, वाढेल BPचा धोका

Thane : ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत विकत होते, पोलिसांनी फिल्डिंग लावून उधळला डाव; बदलापुरातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT