Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: विद्युत पोलवरील चैनल, ट्रॅक्‍टर चोरी; तीन चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात

विद्युत पोलवरील चैनल, ट्रॅक्‍टर चोरी; तीन चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या (Dhule News) कारवाया केल्‍या. या कारवाईमध्‍ये तीन चोरट्यांना मुद्देमालासह ताब्‍यात घेतले आहे. (Tajya Batmya)

वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चैनल व एबी स्विच चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत. हे चोरटे रिक्षाच्या साहाय्याने चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी (Police) जवळपास ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघा चोरट्यांसह हस्तगत केला आहे.

दुसरीकडे शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील चिमठाणा या ठिकाणाहून शेतकऱ्याची ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्र फिरवली असता ही चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याकडून त्याने चोरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sinhastha Kumbhmela : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ; कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Maharashtra News Live Update: राज्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर

Cancer Risk Facts : करपलेली रोटी किंवा ब्रेड खाल्ल्यानं खरंच कॅन्सरचा धोका वाढतो? माहित असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

Eye Care: डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची गायब होतील; हे १५ घरगुती उपाय एकदा करूनच बघा

Health Care : पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे?

SCROLL FOR NEXT