Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल; धुळे महापालिकेची कारवाई

Dhule news : सध्या सणवार असल्याने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत.

भूषण अहिरे

धुळे : शहरात कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत असते. मात्र अनेकजण विना परवानगी बॅनर लावत असतात. अशा पद्धतीने बॅनरच्या माध्यमातून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनर बनवणाऱ्या धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहरात बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधामध्ये (Dhule Corporation) धुळे पालिका प्रशासन आक्रमक झाल्याचे या कारवाईच्या माध्यमातून दिसून येत आहे. सध्या सणवार असल्याने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या दरम्यान पालिका प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य असताना देखील (Dhule) कुठल्याही प्रकारची परवानगी पालिका प्रशासनाची न घेता लावण्यात आलेल्या बॅनरवर पालिका प्रशासनातर्फे आक्रमक भूमिका घेतली आहे. 

महापालिकेकडून अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांचा तपास करत संबंधित बॅनर लावणाऱ्यांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने ही आक्रमक भूमिका घेण्यात आली असून, शहराचे विद्रुपीकरण होऊ नये या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT