Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur: गांजाची शेती उध्वस्त; मका, कापूस पिकात लागवड

गांजाची शेती उध्वस्त; मका, कापूस पिकात लागवड

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी परिसरात असलेल्या लाकड्या हनुमान शिवारात शेती आड गांज्याची लागवड केली होती. पिकांमध्‍ये लागवड केलेली गांजाची शेतीवर छापा टाकत (Police) पोलिसांनी उध्‍वस्‍त केली. (Maharashtra News)

अवैधपणे गांजा लागवड केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule LCB) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्‍यानुसार या माहितीच्या आधारे (Dhule) धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Shirpur) शिरपूर तालुका पोलिसांच्या मदतीने माहिती मिळालेल्या संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तूर, मका, कापूस या पिकांच्या आडून संशयतांनी गांजाची शेती केल्याचे आढळून आले आहे.

७२१ किलो गांजा जप्‍त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांजाची शेती उध्वस्त करत 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 14 लाख 42 हजार पेक्षा जास्तीची मानली जात आहे. या संदर्भात दोघा संशयतांविरोधामध्ये शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mangalsutra Trendy Design: साडीपासून ते जिन्स टॉपवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स, मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

SCROLL FOR NEXT