Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; चालकांसह बसमधील प्रवासी गंभीर जखमी

Dhule News : गुजरात परिवहन विभागाची बस प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली होती. बस शिंदखेडा जवळील निमगूळ गावाजवळ असलेल्या बायपास रस्त्यावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली

भूषण अहिरे

धुळे : गुजरात राज्याची बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात शिंदखेडा जवळील निमगुळ गावाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्यावर घडला असून या अपघातात ट्रक आणि बस चालकांसह बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात रावण करण्यात आले आहे. 

गुजरात परिवहन विभागाची बस प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली होती. बस शिंदखेडा जवळील निमगूळ गावाजवळ असलेल्या बायपास रस्त्यावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर स्थानिकांचे या अपघाताकडे लक्ष गेल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत बचाव कार्य केले आहे. ट्रकची धडक इतकी जोरात होती कि बस (Bus Accident) चालकाकडील बाजू कापली गेली आहे. यामुळे चालकांसह बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. 

दरम्यान (Accident) अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. अपघातामध्ये जखमी झालेल्या काही प्रवाशांची परिस्थिती गंभीर असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच उभे असल्यामुळे वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाल्याचे बघावयास मिळाले. पोलीस प्रशासनाने तात्काळ क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सरकावत वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT