Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी झाली होती. या घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्‍हेगाराला पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून रोख रक्‍कमेसह दुचाकी ताब्‍यात घेतली आहे. (Dhule Crime News)

धुळे (Dhule) शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मोहननगर या परिसरातून गेल्या तीन दिवसांपूर्वी घरमालक उपचारादरम्यान बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी (Theft) घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. या घरफोडीचा तपास करत असताना आझादनगर पोलिसांना धुळे शहरातील सराईत गुन्हेगाराने ही घरफोडी केली असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगारावर धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सव्‍वादोन लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

गुन्‍हेगाराकडून जवळपास 52 हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह या चोरीदरम्यान वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याचबरोबर या कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT