Bribe Saam tv
महाराष्ट्र

लाचखोर वनपाल अटकेत; जप्त लाकडासह वाहन सोडण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

लाचखोर वनपाल अटकेत; जप्त लाकडासह वाहन सोडण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

साम टिव्ही ब्युरो

धुळे : लाकडासह जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपालाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर त्यास अटक झाली. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule News) ही कारवाई केली. सुनील आधार पाटील (वय ५७) असे अटकेतील वनपालाचे नाव आहे. (dhule news Bribe taking forester arrested lcb action)

शहरातील देवपूरमधील दत्तमंदिर कॉलनीत रस्ता रुंदीकरणाकामी अडथळा ठरणारी झाडे महापालिकेने तोडली. तोडलेल्या झाडांची लाकडे पीक-अप वाहनात भरून तक्रारदाराचा मुलगा पारोळा (Parola) चौफुलीमार्गे शहरात येत होता. त्याला कॉटन मार्केटजवळ (Dhule) धुळे वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वाहनासह अडविले आणि वाहन कार्यालयात जमा केले. त्यानंतर तक्रारदाराने वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त वाहन सोडविण्यासाठी वनपाल सुनील पाटील यांची भेट घेतली. त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न

यासंदर्भात तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता वनपाल पाटील याने तक्रारदाराकडे साक्षीदारांसमक्ष पंधरा हजारांच्या लाचेची (Bribe) मागणी केली. मात्र, तक्रारदारासंबंधी वनपाल पाटील याला शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. नंतर पडताळणीवरून वनपाल पाटील याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाल्यावर अटक केली. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

SCROLL FOR NEXT