Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : भर पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला; अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

Dhule News : धुळे- साक्री महामार्गावर काण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनमध्ये शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यावरून भर पावसाळ्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. यासाठी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे- साक्री महामार्गावर नेर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले आहे. अक्कलपाडा उजवा डावा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने हा रास्ता रोको करण्यात आला. 

अक्कलपाडा धरण (Akkalpada Dam) पुर्ण १०० टक्के क्षमतेने भरण्यात यावे, त्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अक्कलपाडा धरणाच्या सध्याच्या ६० टक्के पाणीसाठ्या प्रमाणे (Dhule) धुळे शहराला नियमाप्रमाणे ३०० एमसीएफटी पाणी देण्यात यावे, मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे सैय्यदनगर बंधाऱ्यावरील भदाणेपासून चौगाव पर्यंतच्या ९६०० एकर शेतीला लाटीपाडा धरणातून पूर्वीप्रमाणे पाणी मिळावे, यासह आणखी विविध मागण्यासाठी हा रस्ता रोको यावेळी करण्यात आला आहे.  

दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगा 

धुळे- साक्री महामार्गावर काण्यात आलेल्या या रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलनमध्ये शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT