आशिष शेलार
आशिष शेलार आशिष शेलार
महाराष्ट्र

भाजपतर्फे कटकारस्‍थान नाही; सरकार त्‍यांच्‍या वजनानेच पडेल : आशिष शेलार

भूषण अहिरे

धुळे : विरोधी पक्ष नेत्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची भाजपतर्फे काटकारस्थान केल जात नसून हे सरकार त्यांच्या वजनाने पडेल असे देखील अशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे विद्यमान आमदार आशिष शेलार हे आज धुळे दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्‍यानंतर पत्रकार परिषदेमध्ये शेलार यांनी राज्यपाल यांनी केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेवर बोलताना शेलार हे फक्त कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यपालांवर टीकाकरन किंवा कायदेशीर मार्ग नाही. हॉस्टेलच निमंत्रण आल्यानंतर राज्यपाल त्याठिकाणी जाऊन ओपनिंग करतील. नवाब मलिक आणि त्यांच्या सरकारमधील आकांना जर कोणी बोलत नसेल, तर त्यांनी त्याची कोल्हेकुई राज्यपालांवर टीका करून करू नये. असे म्हणत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

राज्‍य सरकारची दुटप्‍पी भुमिका

लोकल सेवा सुरू करण्यावरून अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका करीत तिकडे सरकारी दप्तर पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे आदेश द्यायचे. दुसरीकडे दोन लसी होऊन सुद्धा नागरिकांना लोकल सेवेतून प्रवास करण्यास मनाई करायची ही राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे. यावर मुंबई उच्च न्यायालय देखील प्रश्न उपस्थित करीत आहे. तसेच आठ वाजेपर्यंत रेस्टॉरंट, बार, पब चालवा आणि दुसरीकडे मंदिर मात्र बंद ठेवा; अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारतर्फे घेतले जात असल्याचे देखील शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

पंचनामे न करता पॅकेज चुकीचे

पूरग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत पॅकेज जाहीर केले. त्यावर शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलल्याप्रमाणे पॅकेज देणारे मुख्यमंत्री नसून मदत देणारे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांनी दहा हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले. कुठल्याही प्रकारची पंचनामे न करता दिलेले पॅकेज हे चुकीचे असल्याचे शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

ठाकरे सरकारच्‍या नेत्‍यांचे आंदोलन टक्‍केवारीचे

विमानतळाच्या नामांतरावर अशिष शेलार यांनी बोलताना शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव भाजपच्या अटलजींच्या सरकार वेळीच देण्यात आले होते. अदानी एअरपोर्ट हस्तांतरण हा ठराव कॅबिनेटमध्ये ठाकरे सरकारने मंजूर केला आहे. यावेळी विमानतळाच्या नावावर हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाबद्दल मानसन्मान ठेवणं हे राज्य सरकारचे कर्तव्य होते. त्यावेळी राज्य सरकारने ठरावामध्ये कुठल्याही अटी शर्ती का टाकल्या नाहीत, हस्तांतरणाचा ठराव त्यांनी करायचा आणि बाहेर आंदोलन देखील तुम्हीच करायचे. लोकांसमोर हात मिळवला आणि त्यानंतर मागच्या बाजूने बाहेर पडल्यानंतर हस्तांदोलन करायचे हे धंदे ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या पक्षातील नेत्यांनी बंद करावेत आणि हे आंदोलन केवळ टक्केवारीचा आंदोलन आहे; असं म्हणत दादांनी जर ठरावाचा भंग केला असेल तर हा ठराव ठाकरे सरकार रद्द करणार का याचं उत्तर सरकारने द्यावे.

दमानियांच्‍या व्‍टीटवर भाष्‍य टाळले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येणार याबाबत अंजली दमानिया यांनी केलेल्‍या ट्विटवर बोलताना भाजप हा विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. केंद्रात बसलेल्या नेत्यांना सर्वच पक्षाचे नेते त्या– त्या कारणाने भेटत असतात. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या ट्विटवर भाष्य करणार नसल्‍याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला SSPMS ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT