Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात झळकले बीआरएस पक्षाचे बॅनर

धुळ्यात झळकले बीआरएस पक्षाचे बॅनर

भूषण अहिरे

धुळे : बीआरएस पक्षाने महाराष्ट्र राज्यामध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये सर्वत्र बीआरएस पक्षाची चर्चा सुरू असताना (Dhule) धुळ्यात देखील बीआरएस पक्षाने जोरदार बॅनर बाजी करून आगमन झाल्याचे बघावयास मिळत आहे. (Maharashtra News)

तेलंगणातील भारत राष्‍ट्र समिती (बीआरएस) महाराष्ट्राच्या राजकारणात देखील बीआरएसने चांगलेच वादळ उठवले आहे. या दरम्‍यान तेलंगणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आषाढीनिमित्‍ताने पंढरपुरात येत आहेत. यामुळे महाराष्‍ट्रातील राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. आता याच अनुषंगाने धुळ्यात देखील बीआरएसचे बॅनर झळकले आहे.

धुळे शहरातील मुख्य चौकाचौकांमध्ये बीआरएस पक्षाचे बॅनर झळकल्यामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. आता याचा परिणाम आगामी काळामध्ये धुळ्यातील राजकारणामध्ये देखील दिसणार का? याकडेच धुळेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT