Mahavikas Aghadi Saam tv
महाराष्ट्र

केंद सरकारने केले एप्रिल फूल; महाविकास आघाडीतर्फे निषेध

केंद सरकारने केले एप्रिल फूल; महाविकास आघाडीतर्फे निषेध

भूषण अहिरे

धुळे : आज १ एप्रिल या तारखेचे औचित्य साधत सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल फूल बनवणाऱ्या केंद्र सरकारचा महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षातर्फे अनोख्या पद्धतीने महागाई धोरणा विरोधात निषेध करण्यात आला. (dhule news April Fools by the Central Government Protest by Mahavikas Aghadi)

जमलेल्या सर्व महाविकास आघाडीच्‍या (Mahavikas Aghadi) पक्ष प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर पेट्रोलपंपावर पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी धारकांना पुष्पहार घालून त्यांना केंद्र सरकारतर्फे एप्रिल फूल बनविण्यात आले असल्याचे म्हणत केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात घोषणाबाजी करून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

महागाईचा भडका कधीच नाही

पेट्रोल– डिझेल बरोबरच गॅसचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले असल्याचे म्हणत विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्वी काँग्रेस (Congress) सरकारतर्फे इतक्या मोठ्या प्रमाणात महागाईचा भडका कधीच झाला नव्हता; असे म्हणत विरोधकांनी मोदी सरकारचा महागाई धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. केंद्र सरकारला या धोरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये फटका बसेल व सर्वसामान्य जनता महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारला चांगलाच धडा शिकवेल असेही मत निषेधकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? मुंबईत भाजप-ठाकरेंमध्ये काटे की टक्कर, वाचा

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Mumbai Travel: मुंबईतील या 5 ठिकाणांना भेट दिली नाही, म्हणजे मुंबई पाहिलीच नाही

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT