Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात अनिल गोटेंच्या उमेदवारीने माविआत बंडखोरी; मित्र पक्षातूनच होतोय विरोध

Dhule News : धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. गोटे हे उद्या मातोश्रीवर पक्षप्रवेश देखील करणार

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटातर्फे अनिल गोटे यांना दिल्या जाणाऱ्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार गोटे यांना जर उमेदवारी दिली; तर महाविकास आघाडीत बंडखोरी करण्याचा इशाराच थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांनी दिला आहे. 

धुळ्यातील (Dhule) माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. गोटे हे उद्या मातोश्रीवर पक्षप्रवेश देखील करणार असून त्यांना उमेदवारी देखील जाहीर केली जाणार आहे. अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर होत असल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू असल्याचे उघड होत आहे. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे नाराज असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

रणजित भोसले अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातर्फे अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली; तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांची अपक्ष उमेदवारी लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे अनिल गोटे यांना दिली जात असलेली उमेदवारी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shinde Vs Dighe: ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

MVA CM Face: मविआचा मुख्यमंत्री कोण? संजय राऊतांकडून वेळ, तारीख जाहीर

तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?

Nashik Politics : नाशिकमध्ये 'सांगली' पॅटर्न; काँग्रेसचे २ इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम? नेमकं काय राजकारण शिजतंय?

Terror Attack: तुर्की दहशतवादी हल्ल्याने हादरलं; १० जणांचा मृत्यू, अनेकांना ठेवलंय ओलीस

SCROLL FOR NEXT