Sendriy Farming  
महाराष्ट्र

कृषिकन्‍येची निसर्गाच्‍या बदलावर मात; सेंद्रीय शेतीतून वर्षासाठी पंधरा लाखाचे उत्‍पन्‍न

शेतकऱ्यांनी दुबार तिबार पेरणी करून देखील अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

भूषण अहिरे

धुळे : एकीकडे धुळे जिल्ह्यामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. दुसरीकडे मात्र साक्री तालुक्यातील विटाई येथील डाळिंब उत्पादक शेतकरी योग्य नियोजन व स्वतःच्या मालकीच्या पोल्ट्री व्यवसायातून मिळणाऱ्या खताचा तसेच घरच्या गाई म्हशीपासून निघणाऱ्या शेन व मूत्राचा खत म्हणून शेतात वापर करत आहे. यामुळे वर्षाकाठी तब्बल पंधरा ते सोळा लाखांचे उत्पन्न घेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये पिकलेला डाळिंब आता विदेशात देखील जाऊ लागला आहे. (dhule-news-Agriculture-overcomes-nature-change-Fifteen-lakh-per-annum-income-from-organic-farming)

धुळे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना उलटला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी दुबार तिबार पेरणी करून देखील अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

चार एकरात डाळींब लागवड

दुसरीकडे धुळे जिल्ह्यातीलच साक्री तालुक्यातील विटाई येथे योग्य नियोजन करीत सेंद्रिय खताच्या जोरावर प्रियंका जोशी या कृषिकन्येने निसर्गाच्या बदलावर मात करीत डाळिंबाच्या चार एकर क्षेत्रातून वर्षाकाठी जवळपास १५ ते १६ लाखांचे उत्पन्न घेतल आहे. हा डाळींब आता थेट बांग्‍लादेशामध्ये निर्यात केला जात आहे.

तेल्‍या रोगावर सेंद्रीय खतांचा वापर

विटाई येथे प्रियांका जोशी यांचा तब्बल चार एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यामध्ये तेल्या रोगाने थैमान घातले होते. शेतकऱ्यांनी या रोगाला कंटाळून डाळिंबाच्या बागा उपटून त्या ठिकाणी इतर पीक घेण्यास सुरुवात केली. परंतु जोशी यांनी मात्र असे न करता डाळिंबाच्या बागेवर आलेल्या तेल्या रोगामुळे हताश न होता सेंद्रिय खतांचा वापर केला व दोन वर्ष या बागेची मशागत करीत कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न घेण्याचा निर्णय घेतला.

शेततळ्यातून पाण्याचे नियोजन

पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतात शेततळे करून शेततळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करीत ठिबक सिंचनद्वारे पाणी पुरवले. तसेच आपल्या मालकीची असलेल्या पोल्ट्रीमधून निघणाऱ्या कोंबड खत त्याचबरोबर घरच्या गाई व म्हशींच्या शेणखत व मलमूत्राचा खत म्हणून वापर डाळिंब पिकाला केल्यामुळे खतावर होणारा मोठा खर्च देखील टळला व तेल्या रोगाचा पूर्णपणे नायनाट देखील झाला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी अक्षरशः जोशी यांच्या बहरलेल्या डाळिंबाच्या बागेकडे माल घेण्यासाठी अक्षरशः रिगच लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

Maharashtra : राष्ट्रवादीसोडून १४ जण भाजपच्या वाट्यावर, यादी पाहून अजित पवार नाराज; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

Special Railway Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त १३८ स्पेशल ट्रेन, ६५० फेऱ्या; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT