धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणारा बिबट्या रात्री पाण्याचा शोधामध्ये विहिरीत पडल्याचे सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सकाळपासून बघ्यांची एकच गर्दी जमली होती. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे (Forest Department) पथक घटनास्थळी दाखल झाले व जवळपास चार तासांहून अधिकच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला (Leopard) विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. (dhule news After a four hour rescue the leopard was pulled out of the well)
गेल्या कित्येक दिवसांपासून या बिबट्याचा वावर परिसरात असल्याचे नागरिकांतर्फे वन विभागाच्या (Dhule News) अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. परिसरामध्ये शेतकरी या बिबट्याच्या दहशतीखाली वावरत होते. परंतु अखेर बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या बिबट्याला विहरी बाहेर काढल्यानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.