accident 
महाराष्ट्र

टँकर उलटला अन्‌ नागरीकांचा चंगळ; बादली, हंडे घेवून नागरीकांच्‍या रांगा

टँकर उलटला अन्‌ नागरीकांचा चंगळ; बादली, हंडे घेवून नागरीकांच्‍या रांगा

भूषण अहिरे

धुळे : धुळे– सुरत महामार्गावर (Dhule surat Highway) तेलाने भरलेला टँकरचा अपघात झाला. यात टँकर पलटी झाल्‍याने जमिनीवर तेल सांडले गेले. यावेळी नागरिकांनी हातात मिळेल ते भांडे घेऊन तेल भरून नेले.

साक्री तालुक्यात धुळे- सुरत महामार्गावर एका खाद्यतेलाच्या टँकरचा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तेलाने भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटला. परंतु या अपघातामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसून वाहन चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत.

भांडे घेवून नागरीकांच्‍या रांगा

खाद्यतेलाने भरलेला टँकर पलटल्याची माहिती परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील ग्रामस्थांची मात्र चांगलीच चंगळ झाली. नागरिकांनी या पलटी झालेल्या टँकरमधून तेल वाहून नेण्यासाठी चक्क बादली, हंडे, कळशा, हातात मिळेल ते भांडे घेऊन टँकरच्या दिशेने धाव घेतली. टँकरच्या अवतीभवती तेल घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामध्ये चक्क नागरिकांनी टँकरमधून तेल घेण्यासाठी लांबच लांब रांगा देखील लावल्याचे बघावयास मिळाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT