MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

लालपरीच्या रोज ५०० फेऱ्या; अडीच हजार कर्मचारी अद्याप गैरहजर

लालपरीच्या रोज ५०० फेऱ्या; अडीच हजार कर्मचारी अद्याप गैरहजर

साम टिव्ही ब्युरो

धुळे : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद दुखवट्याला पाच महिने होत आहेत. तरीही संप मिटण्याचे नाव नाही. शासकीय स्तरावर संपाचा (St Strike) तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. न्यायालयात ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. संपामुळे गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे. त्यात लालपरीच्या रोज सरासरी पाचशे फेऱ्या होत असून, अडीच हजार कर्मचारी अद्याप गैरहजर आहेत. (dhule 500 rounds of msrtc bus daily Two and half thousand employee still absent)

एसटी महामंडळाच्या (MSRTC) विलीनीकरणाचा मुद्दा लावून धरत कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कामावर दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामावर परत आल्याशिवाय चर्चा शक्य नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अगोदर कोरोनामुळे (Corona) थांबलेल्या एसटीला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्बंध शिथिल होऊनही गती मिळाली नाही. सद्यःस्थितीत लांब पल्ल्याची वाहतूक सुरू आहे. मात्र, ग्रामीण एसटी सेवा बंदच आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशांना बसला आहे.

राज्य शासनाचे आवाहन

धुळे (Dhule) विभागातील सुमारे तीन हजार ३११ कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार ४६३ कर्मचारी अद्याप कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्णक्षमतेने धावू शकली नाही. धुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आतापर्यंत सुमारे ८४८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. दहा मार्चपूर्वी २६३ कर्मचारी बडतर्फ आणि ३१० कर्मचारी निलंबित झाले आहेत. तथापि, २५ मार्चला राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर दाखल होण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. सध्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बससेवा सुरू आहे. धुळे व नंदुरबार (Nandurbar) दोन्ही जिल्ह्यांत रोज सुमारे पाचशे फेऱ्या‍ होत असल्याचा दावा आहे. शासनाच्या आवाहनानुसार ३१ मार्चला किती कर्मचारी सेवेत हजर होतात याकडे प्रवाशांचे लक्ष असेल.

धुळे विभागात ८४८ कर्मचारी हजर

धुळे विभागात एक हजार २३८ चालक आहेत. पैकी १३८ चालक हजर झाले आहेत. तसेच एक हजार १२७ वाहकांपैकी १७२ वाहक रुजू झाले आहेत. त्याचबरोबर ५५२ यांत्रिकी कर्मचाऱ्यांपैकी २५१ कर्मचारी रुजू झाले आहेत. विभागात ३९४ प्रशासकीय कर्मचारी आहेत. पैकी २८७ कामावर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT