Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या ३५ बुलेट जप्त; धुळे वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आज शहरातील विविध मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसातर्फे कारवाई करत ३५ बुलेट पोलिसानं जप्त केल्या आहेत.

शहरातील रस्त्यांवरून बुलेटची फायरिंग बदलवून सुसाट वेगाने गाड्या चालविल्या जातात. शिवाय फटाके फोडणाऱ्या गाड्या देखील रस्त्यावरून जाताना दिसतात. कर्णकर्कश्य आवाज करून फटाक्याप्रमाणे आवाज करून कानाला इजा पोहोचेल असे आवाज या बुलेट्स मधून निघत असल्याने अशांविरोधात (Dhule) धुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 

प्रत्येकी एक हजाराचा दंड 
वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) जवळपास ३५ बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले असून, संबंधित बुलेट धारकांवर एक हजार रुपये प्रमाणे दंड देखील आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कारवाई यापुढे देखील अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याचे धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Thane Visit: पीएम मोदींच्या सभेसाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Marathi News Live Updates : महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली; भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या

Cake Cancer News : सावधान! केक खाल्ल्याने कॅन्सर होतो, खळबळ उडवून देणारा दावा; व्हायरल मॅसेजमागचं सत्य काय?

Ishan Kishan: इशान किशनचं टेन्शन वाढलं! हा स्टार खेळाडू जागा घेण्यासाठी तयार; आता कमबॅक करणं कठीण

Gold Silver Rate : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, चांदी २ हजार रुपयांनी महागली; आजचा भाव वाचलात का?

SCROLL FOR NEXT