dhule municipal corporation removes encroachment from old agra road today saam tv
महाराष्ट्र

Dhule News : जुना आग्रा रोड परिसरातील अतिक्रमणे हटवली, धुळे पालिकेची धडक कारवाई

अतिक्रमण विराेधी माेहिम सुरू ठेवणार असल्याचे धुळे पालिकेने स्पष्ट केले.

भूषण अहिरे

Dhule News :

घुळे पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागातर्फे आज (बुधवार) धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. या धडक कारवाईची शहरात जाेरदार चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)

धुऴे पालिकेने आज वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या व रस्त्यामध्ये हातगाडीवर विविध प्रकारच्या मालाची विक्री करणाऱ्या हातगाडी धारकांवर कारवाई केली. ज्या दुकान मालकांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा दुकानांवर देखील कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनातर्फे वारंवार या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु पालिका प्रशासनाच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करत या अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण कायम ठेवल्यामुळे आज पालिका प्रशासनातर्फे आज धडक कारवाई करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजीपाला विक्रेते त्याचबरोबर इतर मालविक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेमध्येच त्यांनी आपल्या मालाची विक्री करावी असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे अतिक्रमण कारवाई सुरू ठेवणार असल्याचे देखील अतिक्रमण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT