Dhule news Saam tv
महाराष्ट्र

Ayodhya Ram Mandir: धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, अयोध्या राम मंदिरावरील फडकणारा ध्वज धुळेकरांचा

Ayodhya Ram Mandir dhule: मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातील कारागीरांनाही योगदान दिलं आहे. त्याचबरोबर या मंदिरावर फडकणारा ध्वज हा एका धुळेकरांनी बनवला आहे. यामुळे धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भूषण अहिरे

Dhule News:

अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण आज सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडलं. श्रीराम मंदिरातील रामाची मूर्तीची थाटामाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातील कारागीरांनाही योगदान दिलं आहे. त्याचबरोबर या मंदिरावर फडकणारा ध्वज हा एका धुळेकरांनी बनवला आहे. यामुळे धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Latest Marathi News)

अयोध्या येथे भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. तर विशेष म्हणजे या राम मंदिरावर जो ध्वज मोठ्या डौलाने फडकत आहे, हा ध्वज महाराष्ट्रातील धुळे येथून पाठविण्यात आला आहे . धुळ्यातील विशाल केले यांनी हा ध्वज बनवून धुळ्यातून महंत केशव आयाचित यांच्या स्वाधीन केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महंत केशव हे आज अयोध्या मंदिरातील गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थित होते. त्यांनी हा ध्वज मंदिरावर फडकवला आहे. फक्त ध्वजच नव्हे तर ज्या कलशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली, तो कलश देखील धुळ्यातून पाठविण्यात आला होता. तो देखील विशाल केले यांनी पाठविला आहे.

अमरावतीत हनुमान गढीवर दिवाळी

अयोध्या आज येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिवाळी साजरी केली.

यावेळी हजारो दिवे लावून या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली. तर खासदार नवनीत राणा यांनी जय श्रीराम आणि ओम चित्र दिव्यांनी रेखाटले गेले. तसेच हजारो दिव्यांनी हनुमानगढी उजाळून गेली होती, तर यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी राममंदिराचा लोकार्पणाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT