धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत गावठी कट्टे विकणारी टोळी गजाआड केली आहे. गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोपड्याहून दोंडाई मार्गे स्कार्पिओ कार मधून राजस्थानकडे काही जण जात असून त्यांच्याकडे गावठी कट्टे असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती.
हे देखील पहा -
मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथक बनवून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील चिलाने या गावाजवळ सापळा रचला असता माहिती मिळालेली स्कार्पिओ क्र. जी जे 08 बी बी 5069 ही कार आढळून आली. पथकाने ही कार पाठलाग करून थांबविली. त्यामध्ये बसलेल्या इसमांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर संबंधित पथकाने या दोघांची देखील तपासणी केली.
परंतु त्यांच्याकडे काहीच मिळून आले नाही. त्यामुळे या संशयितांना वाहनासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. मेकॅनिक द्वारे वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता वाहनामध्ये एक विशिष्ट जागा बनवून त्यामध्ये तीन गावठी कट्टे व सोळा जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली.
या दोघांच्या मुसक्या आवळल्या नंतर या दोघांनी हे जिवंत काडतुसे व गावठी कट्टे कुठून व कुणासाठी आणले या संदर्भातील सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.