Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: रेल्वेखाली उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्ज, नापिकेमुळे उचलले पाऊल

रेल्वेखाली उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्ज, नापिकेमुळे उचलले पाऊल

साम टिव्ही ब्युरो

दोंडाईचा (धुळे) : डोंगरगाव (ता. शहादा) येथील शेतकरी प्रेमसिंग रतनसिंग गिरासे (वय ५७) यांनी रामी- पथारे (Dhule) शिवारात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. कर्जबाजारी व नापिकीमुळे त्यांनी जीवन संपविल्याचे (Farmer) सांगण्यात येत आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ही घटना घडली असून, त्याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. (Live Marathi News)

रामी- पथारे (ता. शिंदखेडा) शिवारात दोंडाईचापासून (Dondaicha) काही किलोमीटरवर रेल्वेरुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाल्याने त्यांनी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तपासाअंती तो डोंगरगाव येथील शेतकरी प्रेमसिंग रतनसिंग गिरासे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कर्जफेडीचा तगादा

प्रेमसिंग गिरासे हे शेतीवर उदरनिर्वाह करीत होते. मात्र काही वर्षांपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. वेळेत कर्जाची परतफेड करता न आल्याने त्यांच्याकडे तगादा सुरू होता. त्यातून ते खचून गेले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव येथील नातेवाईक दोंडाईचा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT