Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: भर चौकात शस्‍त्राचा धाक दाखवून लूट; मुद्देमालासह दोघे चोरटे ताब्‍यात

भर चौकात शस्‍त्राचा धाक दाखवून लूट; मुद्देमालासह दोघे चोरटे ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट केल्‍याचा प्रकार धुळ्यात झाला होता. ही लूट करणाऱ्या दोघा (Dhule News) चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एक लाखांहून अधिकच्या मुद्देमाला सकट मुसक्या आवळल्या आहेत. (Breaking Marathi News)

धुळे शहरातील बारा पत्थर चौकामध्ये गॅरेजबाहेर उभ्या असलेल्या इसमास धारदार शास्त्राचा धाक दाखवून सोन्याचे ब्रासलेट व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. या चोरट्यांच्या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व धुळे शहर पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तरित्या तपास करत असताना हे सराईत धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील एका हॉटेलजवळ उभे असल्याची गुप्त माहिती दारामार्फत (Dhule LCB) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली.

मिळालेल्‍या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडे जवळपास एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर या लुटीसह या चोरट्यांनी आणखी एका घरफोडी संदर्भात देखील कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघाही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह धुळे शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT