Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : हॉटेलमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dhule News : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हि घटना घडली आहे. मुंबई- आग्रा महामार्गा लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघेजण जेवणासाठी गेले होते.

भूषण अहिरे

धुळे : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोघा जणांवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये धुळे शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत असून, पोलिसांकडून अशा वाढत्या घटनांना आळा घालणे अपेक्षित असल्याची चर्चा आता होत आहे. 

धुळे (Dhule) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हि घटना घडली आहे. मुंबई- आग्रा महामार्गा लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघेजण जेवणासाठी गेले होते. या दरम्यान त्या दोघा जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धारदार शस्त्र त्याचबरोबर लोखंडी रॉडच्या साह्याने काही जणांनी हा दोघावर जीवघेणा हल्ला केला आहे.  या हल्ल्यामध्ये दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद  
सदर हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यासंदर्भात मोहाडी पोलिसांना या घटनेची माहिती (Crime News) मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन माहिती घेतली. तर मोहाडी पोलीस आता या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या हल्लेखोरांचा शोध घेत असून यासंदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. धुळे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे देखील बघावयास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT