Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : पूजा बागुल हत्या प्रकरण; मारेकरी पतीसह प्रेयसीला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अन्य संशयित अद्याप फरार

Dhule Crime News : सैन्य दलातील कपिल बागुल याचे महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत संबंध असल्याची माहिती पत्नी पूजाला समजली. यातून दोघांमध्ये वाद होत होते. या कौटुंबिक वादातून पत्नी पूजाची हत्या करण्यात आली

भूषण अहिरे

धुळे : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने आपल्या महाविद्यालयातील प्रेयसीसाठी पत्नी पूजा उर्फ शारदा हिला विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याची घटना १ जूनला उघडकीस आली. या घटनेने धुळ्यामध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान खून करणाऱ्या पतीसह त्याच्या प्रेयसीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर पूजाचे सासू, सासरे व नणंद यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 

धुळे शहरातील वलवाडी परिसरात सदर खुनाची घटना घडली होती. यात सैन्य दलातील कपिल बागुल याचे त्याच्या महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत संबंध असल्याची माहिती पत्नी पूजा हिला समजली होती. यातून दोघांमध्ये वाद होत होते. दरम्यान या कौटुंबिक वादातून पत्नी पूजा उर्फ शारदा हिला पेस्टिसाइड इंजेक्शन दिले. यानंतर दोन तासांपेक्षा जास्त वेळ कपिल तिच्या मृत्यूची वाट पाहत होता. शिवाय तिच्या डोक्यावर वस्तूने वार करून खून करण्यात आला. 

पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ 

या प्रकरणी मृत पूजाचा भाऊ भूषण महाजन याने  पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कपिल बागुल याच्यासह त्याचे वडील बाळू बुधा बागुल, आई विजया, बहीण रंजना धनेश माळी, प्रेयसी प्रज्ञा कर्डिले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली असून सर्व पाच संशयितांना आज दुपारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

चार संशयित अजूनही मोकाट 

दरम्यान या गुन्ह्यातील कपिल व प्रज्ञा यांच्याकडून अजून काही प्रश्नांची उकल करणे राहिले असून इतर चार संशयित अजून गजाआड झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पश्चिम देवपूर पोलिसांनी केली होती. न्यायालयाने कपिल व प्रज्ञा यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची म्हणजे ७ जूनपर्यंत वाढ केली आहे. तर कपिलचे वडील बाळू बागुल, आई विजया, बहीण रंजना यांना न्यायालयीन कोठडी देत त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

SCROLL FOR NEXT