Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: रात्री मित्रांसोबत पार्टीला गेलेल्‍या तरुणाची हत्‍या

रात्री मित्रांसोबत पार्टीला गेलेल्‍या तरुणाची हत्‍या

भूषण अहिरे

धुळे : तरुणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे धुळे पुन्हा एकदा हादरले आहे. धुळ्यातील मोहाडी परिसरामध्ये तीस वर्षीय तरुणाचे शीर व धड अलग करून तरुणाचा खून (Crime News) करण्यात आला (Dhule News) असल्याची घटना घडली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

सतीश बापू मिस्तरी (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश हा नित्यानंद सोसायटी मोहाडी उपनगर येथील रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. रात्री हा तरुण आपल्या मित्रांसोबत या सुनसान ठिकाणी पार्टी करण्यासाठी आला असल्याचे देखील प्राथमिक माहितीत समोर आली आहे. त्यामुळे या तरुणाचा इतक्या निर्घृणपणे खून कुठल्या कारणास्‍तव करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून या खुनाचा तपास पोलिसांतर्फे लावण्याचे काम सुरू आहे. खून कुठल्या कारणास्थत करण्यात आला. तसेच त्याचा खून कुणी केला याचा सर्व तपास आता पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

शिवाजी महाराजांनी छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

SCROLL FOR NEXT