Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan News: मशाल चिन्ह परत मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

मशाल चिन्ह परत मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
Published on

अभिजीत देशमुख

कल्याण : उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येत आहे. समता पार्टीने (Samata Party) मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याबाबत बोलताना समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी सांगितले. (Letest Marathi News)

Kalyan News
Accident News: पुलावरुन ३० फुट खोल नदीत कोसळला ट्रॅक्‍टर; एकाचा जागीच मृत्‍यू, दोघे गंभीर जखमी

मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केल्याचा आरोप त्‍यांनी केला. मशाल चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले; तिच खरी शिवसेना आहे. जे आता मशाल मशाल करतायात ती समता पार्टीचे मशाल आहे.

ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती. त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं. उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे. त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केले. आज त्यांचा अहंकार उध्वस्त झाला. (Shiv Sena) शिवसेनेतील अंतर्गत वादावर आता तोडगा निघालाय शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालय त्यामुळे मशाल चिन्ह हे समता पार्टीचे आहे ते आम्हाला मिळावं; यासाठी याचिका दाखल केल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी सांगितले.

चोर तुम्ही आहात; ठाकरे गटावर पलटवार

ठाकरे गटाकडून समता पार्टीला फूस असल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत बोलताना उदय मंडल यांनी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना डी रजिस्टर आणि डी रेकग्नाइज त्याच्यातला अर्थ कळत नाही. त्यांना खासदार कुणी बनवलं. उद्धव ठाकरे यांनी जी गॅंग बनवली आहे; ती अशिक्षित लोकांची टोळी आहे. अनिल देसाई किंवा संजय राऊत हे सगळे एकच भाषा बोलतात. जोपर्यंत मशाल त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालंय. चोर तुम्ही आहात तुम्ही आमची मशाल चोरली असा पलटवार ठाकरे गटावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com