Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन बंगाली कारागीर फरार; धुळ्यातील सराफ व्यावसायिकाची फसवणूक

Dhule News : सराफ व्यावसायिक विक्रम मैती यांनी २६ फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान धनंजय लायक याच्याकडे एकूण ६८५ ग्रॅम कच्चे व प्युअर सोने आणि मिश्रधातू ज्याची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत ४५ लाख इतकी होती

Rajesh Sonwane

धुळे : धुळे शहरातील एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दागिने घडविण्यासाठी कामगाराला कच्चे सोने ज्वेलर्स दुकानदाराने दिले होते. मात्र हेच सोने घेऊन कारागीर फरार झाल्याने सराफ व्यावसायिकाला तब्बल ४५ लाख रुपयात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धुळ्याच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धुळे शहरातील विक्रम शक्ती मैती यांचे शक्ती ज्वेलर्स नावाने सराफ दुकान आहे. बंगाली कारागिराकडून ते नेहमी दागिने घडवून घेत असतात. त्यानुसार दुकानातील कारागीर पश्चिम बंगाल मधील केंदुआडीही येथील धनंजय विश्वनाथ लायक (वय ४५) याच्याकडे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी कच्चे, प्युअर सोने व मिश्रधातू द्यायचे. यानंतर कारागीर नेहमीप्रमाणे साधारण दहा ते पंधरा दिवसांत दागिने बनवून द्यायचा. 

६८५ ग्रॅम सोने घेऊन झाला फरार 

दरम्यान सराफ व्यावसायिक विक्रम मैती यांनी २६ फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान धनंजय लायक याच्याकडे एकूण ६८५.१२९ ग्रॅम कच्चे व प्युअर सोने आणि मिश्रधातू ज्याची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत ४५ लाख इतकी होती. सोन्याचे दागिने बनविण्यासाठी हे कच्चे सोने दिले होते. मात्र, कारागीर लायक याने दागिने घडवून ते परत न करता सराफ व्यावसायिकाची फसवणूक करून फरार झाला. 

कारागीराविरुद्ध गुन्हा दाखल 

बरेच दिवस होऊन देखील दागिने न मिळाल्याने सराफ व्यावसायिक मेथी यांनी त्याचा तपास करत सर्वत्र शोध घेऊनही तो कुठे मिळून आला नाही. यामुळे तो फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात जाऊन विक्रम मैती यांनी आझादनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कारागीर लायक याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक राजश्री पाटील तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT