Dhule Tragedy Saam
महाराष्ट्र

धुळ्यात महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल

Dhule Tragedy: धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

  • धुळेच्या स्नेहनगर परिसरातील धक्कादायक आत्महत्या प्रकरण.

  • माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे गळफास घेत मृत.

  • घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने विराज एकटाच होता.

  • आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिस तपास सुरू.

धुळ्यातील स्नेहनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस येत आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती यांच्या मुलानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरूवारी (११ सप्टेंबर) रोजी समोर आली आहे. (९ सप्टेंबर) रोजी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ३ दिवसानंतर त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यानं आयुष्य संपवलं. आत्महत्येच्या दिवशी विराज घरी एकटाच होता. संपूर्ण कुटुंब ११ सप्टेंबर रोजी बाहेर गेले होते. कुणीही घरात नसताना त्यानं गळफास घेतला.

काही वेळानंतर कुटुंब बाहेरहून घरी परतले. तेव्हा विराजला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून धक्काच बसला. शिंदे कुटुंबाने तातडीने विराजला जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. विराजच्या मृत्यूनंतर शिंदे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला.

विराजनं आत्महत्या का केली? आयुष्य संपवण्यामागचं कारण काय? याचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरूवात केली असून, विराजनं टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, विराजच्या मृत्यूनंतर गावात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: ही 4 ‘साइलेंट’ लक्षणं दिसली तर तत्काळ सावध व्हा; हार्ट अटॅकची सुरूवात असू शकते

Beed Crime: प्रवाशांनो सावधान! बीड ते तुळजापूर दरम्यान १० धोकादायक ठिकाणे, महामार्गावर होतेय जबरी चोरी अन् लुटमार

चौकशीपासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी अजितदादांचे पाय पकडले; माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, जरांगेंचे गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Live News Update: वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला केली लैंगिक सुखाची मागणी

CBSE Recruitment: सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची संधी;विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT