Cotton Theft Saam tv
महाराष्ट्र

Cotton Theft : शेतकऱ्याला दोरीने बांधून मारहाण करत ३० क्विंटल कापूस लंपास

Dhule News : पहाटे १० ते १२ जणांच्या टोळीने त्यांना झोपेत बेदम मारहाण करून, दोरीने त्यांचे हातपाय बांधून ज्वारीच्या शेतात फेकून दिले

भूषण अहिरे

धुळे : शेतात बांधलेल्या घरात कापूस काढून ठेवला होता. भाव नसल्याने कापूस घरात साठवून ठेवला आहे. (Dhule) या कापसाची राखण करण्यासाठी शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला (Farmer) दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवत मारहाण केली. यानंतर घरातील ३० क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना घडली आहे.   (Breaking Marathi News)

धुळे येथील शिरूड शिवारातील विंचूर चौफुलीजवळील शेतात ही घटना घडली आहे. विजय सोनवणे हे रात्री शेतात राखण करण्यासाठी थांबले होते. या दरम्यान पहाटे १० ते १२ जणांच्या टोळीने त्यांना झोपेत बेदम (Crime) मारहाण करून, दोरीने त्यांचे हातपाय बांधून ज्वारीच्या शेतात फेकून दिले. त्यानंतर लगेच घराच्या मागील बाजूस वाहन लावून घराची भिंत तोडून सुमारे ३० क्विंटलपेक्षा अधिक कापूस (Cotton) चोरून नेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर विजय सोनवणे यांनी गावात सांगितली. तसेच पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. विजय सोनवणे यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर धुळे तालुका पोलीस या चोरट्यांचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT