Dhule Corporation
Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

हंडे घेवून महिला पोहचल्‍या आयुक्‍त कार्यालयात; धुळे मनपा विरोधात मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : उन्हाच्या झळा सहन करत असताना नागरिकांना आता पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागत आहे. आठ दिवस उलटून देखील धुळे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर हंडा मोर्चा काढला. तसेच धुळे महापालिका (Dhule Corporation) प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. (dhule corporation news women handa Morcha against Dhule Corporation)

एक दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना वेळोवेळी देण्यात आले आहे. परंतु जवळपास आठ ते नऊ दिवस उलटून देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

भर उन्‍हात पोहचल्‍या मनपात

पाण्यासाठी दररोज भर उन्‍हात (Dhule News) वणवण फिरावे लागते. रोजच्‍या या त्रासाने संतप्‍त झाल्‍याने महिलांनी आज अखेर पालिकेवर हंडा मोर्चा नेत थेट पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले आहे. पाण्यासाठी पायी जात असलेल्‍या महिला महापालिकेवर देखील पायीच पोहचल्‍या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला SSPMS ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT