Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : महानगरपालिके विरोधात निषेध होळी; वाढीव मालमत्ता करवाढीला विरोध

dhule News : होळी दरम्यान पालिका प्रशासनाच्या त्याचबरोबर खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यंदा सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात घरपट्टी करात वाढ (Dhule) करण्यात आली आहे. महापालिकेच्या या धोरणा विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत शिवसेना (Shiv Sena) उबाठा गटाच्या वतीने धुळे महानगर पालिका प्रवेशद्वाराच्या बाहेर निषेधाची होळी करण्यात आली आहे. (Live Marathi News)

धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) हद्दीतील शहरवासीयांना दुपटीने घरपट्टी पालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भरावी लागत असल्याचा आरोप उबाठा शिवसैनिकांच्या वतीने लावण्यात आला. या संदर्भात पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी निषेध होळीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या होळी दरम्यान पालिका प्रशासनाच्या त्याचबरोबर खासदार सुभाष भामरे (subhash Bhamre) यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालिका प्रशासनाच्या घरपट्टी वाढ धोरणास हातभार लावणाऱ्या खासदार सुभाष भामरे यांना भाजपतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना धुळेकरांनी मतदान न करता घरपट्टी वाढी संदर्भात जाब विचारण्याचे देखील आवाहन उबाठा शिवसैनिकांतर्फे धुळेकर नागरिकांना करण्यात आले आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

Jalgaon : चोरट्यांची स्मशानाभूमीवर नजर, सोन्याच्या लालसेनं स्मशानभूमीत चोरी

SCROLL FOR NEXT