Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation: पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधी, नागरिकांची गांधीगिरी

पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधी, नागरिकांची गांधीगिरी

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील विविध भागांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पालिका (Dhule Corporation) प्रशासन दुर्लक्ष करत असल्‍याने आज स्‍थानिक लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरीकांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. (Dhule Corporation News)

पाण्याचा प्रश्नाबाबत पालिका प्रशासनाला गांभीर्याने (Dhule) लक्ष देण्यासंदर्भात वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधीतर्फे आंदोलन करून निवेदन दिले. तरीदेखील पालिका प्रशासनातर्फे या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. त्यासाठी अखेर स्थानिक लोकप्रतिनिधीतर्फे तसेच परिसरातील नागरिकांतर्फे गांधीगिरी पद्धतीने गुलाब हातात घेऊन पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत.

जनआंदोलन छेडण्याचा इशारा

यानंतर देखील पालिका प्रशासनातर्फे प्रभाग क्रमांक 12 येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न पालिका प्रशासनातर्फे सोडविण्यात आला नाही. तर आगामी काळात उग्रपणे जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नगरसेवक त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली, मृतदेह पोत्यात भरून घराच्या गेटवर लटकवला, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

Pune : घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर पोलिसांचा छापा | VIDEO

'पाकिस्तानने ७ भारतीय लढाऊ विमाने पाडली, त्यांना भंगार..' पंतप्रधानांचा मोठा दावा, ट्रम्पचंही कौतुक

DRDO Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार डीआरडीओमध्ये नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

SCROLL FOR NEXT