पैशांचा मोह पडला महाग..कौन बनेगा करोडपतीच्या नावाने फसवणूक

पैशांचा मोह पडला महाग..कौन बनेगा करोडपतीच्या नावाने फसवणूक
Ahmednagar Cyber Crime
Ahmednagar Cyber CrimeSaam tv
Published On

अहमदनगर : ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्‍ही कार्यक्रमातून बोलत असल्‍याचे सांगत तरूणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात एक लाख ३३ हजार २०० रूपयांची (Fraud) फसवणूक झाली आहे. याप्रकरणी (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तीन मोबाईल नंबर धारक आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar News Cyber Crime)

Ahmednagar Cyber Crime
Beed: विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव; सासरच्या लोकांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल

सर्जेपुरा भागातील नारायण गजराज अरूणे (वय २९) यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्‍या व्‍यक्‍तीने (Kaun Banega Crorepati) ‘कौन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्‍याचे सांगत तुमचा मोबाईल क्रमांक लकी विनर म्हणून निवडला आहे. (Ahmednagar) त्यावरून तुम्हाला २५ लाख रूपयांची लॉटरी देण्यात येत असल्‍याचे सांगितले. त्यानंतर अन्‍य नंबरहूनही असाच फोन आला. या दोन्ही मोबाईलधारक व्यक्तींनी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच २५ लाखांची लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी, इन्कमटॅक्सच्या नावाखाली सुरूवातीला काही पैसे त्यांचे गुगल पे अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले.

आठ महिने चालला खेळ

आपल्‍याला २५ लाख रूपये मिळणार या आशेने नारायण अरूणे या तरूणाने २० ऑगस्ट २०२१ ते १० मार्च २०२२ या आठ महिन्‍याच्‍या कालावधीत एक लाख ३३ हजार २०० रूपये गुगल पे तसेच बँक खात्यावर पाठविले. मात्र त्यानंतर तिनही मोबाईल नंबर बंद झाले. अनेक वेळा संपर्क करूनही त्या मोबाईल धारकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांना लॉटरीचे पैसेही मिळाले नाही. यामुळे अरूणे यांनी १ ऑगस्टला सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com