Heavy Rain 
महाराष्ट्र

मुसळधार पावसाने धुळेही जलमय; घरांमध्ये साचले गुडघाभर पाणी

मुसळधार पावसाने धुळेही जलमय; घरांमध्ये साचले गुडघाभर पाणी

भूषण अहिरे

धुळे : जळगाव जिल्‍ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने चाळीसगाव जलमय झाले. यानंतर मंगळवारी रात्री धुळे शहर व परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्‍याने धुळे देखील जलमय झाले आहे. घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. (Dhule-city-is-also-waterlogged-by-torrential-rains-Knee-deep-water-in-the-houses)

धुळे शहरासह तालुक्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर धुळे शहरातील मच्छीबाजार त्याचबरोबर अजमेरानगर त्याचबरोबर १०० फुटी रोड या परिसरामध्ये अक्षरशः पाणी घुसल्यानंतर संपूर्ण नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी असल्याचे दिसून येत आहे.

संसार वाचवण्याचा प्रयत्न

मुसळधार पाऊस होत असल्‍याने रात्रभर या नागरिकांनी आपला बुडालेला संसार वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. रात्रभर घरात पाण्याचा तांडव सुरू असताना सकाळपासून देखील प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतरही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचला नसल्याचे या नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

SCROLL FOR NEXT