Dhule Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : भीषण अपघात! ट्रकवरील कंट्रोल सुटला, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पायी जाणाऱ्या भाविकांना उडवलं

Dhule Accident News : धुळ्यात शिर्डीला पायी जाणाऱ्या भाविकांना ट्रकची जोरदार धडक बसली. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • धुळ्यात शिर्डी पदयात्रेतील भाविकांना ट्रकची धडक

  • दोन भाविक गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • रस्त्यातील खड्ड्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले

  • अपघातानंतर परिसरात भीती व बघ्यांची गर्दी

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यात भीषण अपघात झाला आहे. शिर्डीकडे पायी जाणाऱ्या भाविकांना ट्रक चालकाने धडक दिली आहे. या धडकेत दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रकवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात कडून शिर्डी कडे जवळपास 140 भाविक हे पदयात्रेच्या माध्यमातून पिंपळनेर-दहिवेल रस्त्यावरून पायी चालत जात होते. रस्त्यात अचानक खड्डा आल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि पायी चालणाऱ्या भाविकांना या ट्रकने चिरडले. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

स्थानिकांच्या मदतीने तात्काळ या जखमी भाविकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या घटनेनंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली. या अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतल्या साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT