Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू

Dhule News : दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

चिमठाणे (धुळे) : चिमठाणे- शिंदखेडा राज्यमार्गावर चिमठाण्याजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या (Accident) अपघातात वर्डे टेंभें येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दुसरा दुचाकीस्वार (Dhule) घटनास्थळावरून फरार झाला आहे. (Latest Marathi News)

चिमठाणे- शिंदखेडा राज्यमार्गावर मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वर्डे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील राजेंद्र दिवानसिंह गिरासे शिंदखेडा येथून दुचाकीने साळवे (ता. शिंदखेडा) कडे जात होते. या दरम्यान चिमठाण्याकडून दुसऱ्या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली. यात गिरासे यांना गंभीर दुखापत झाल्याने चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कांटे यांनी रात्री सव्वा आठच्या सुमारास मृत घोषित केले.

अपघाताबाबत चुलत शालक लालसिंह नारायणसिंह गिरासे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून समोरील दुचाकीचालकाने धडक देऊन गंभीर दुखापत केली. राजेंद्र गिरासे यांच्या गंभीर दुखापती व मृत्यूस कारणीभूत झाला तसेच दोन्ही मोटारसायकल नुकसानीस कारणीभूत झाला व अपघातची खबर न देता पळून गेला म्हणून दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी...

मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

South Indian Appam : नाश्त्याला घरीच बनवा १० मिनिटांत अप्पम, वाचा रेसिपी

Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाण लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख आली समोर

Suraj Chavan Wedding : सूरज होणार पुरंदरचा जावई! साखरपुडा, हळद, विवाहसोहळ्याची तारीख ठरली, लग्नपत्रिका पाहिलीत?

SCROLL FOR NEXT