Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: महामार्गावर गॅस टँकर पलटी; परिसरात उडाली खळबळ

महामार्गावर गॅस टँकर पलटी; परिसरात उडाली खळबळ

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड गावाजवळ गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. टँकर पलटी झाल्‍यानंतर गॅस (Gas) गळती होवू लागल्‍याने परिसरात खबराट निर्माण झाली होती. (Letest Marathi News)

बडोद्याहून हैदराबादकडे जाणारा गॅस टँकर चालवत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली आहे. त्याचबरोबर गॅस गळतीमुळे होणारा मोठा धोका देखील टळला असल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.

अग्निशमन दल तातडीने दाखल

गॅस टँकर पलटी झाल्‍यानंतर टँकरमधून गॅस गळती देखील सुरू झाली होती. परंतु अग्निशमन विभागाच्या पथकास या संदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत ही गॅस गळती अथक प्रयत्नानंतर थांबविण्यात आली आहे. यामुळे पुढची मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT