Accident Saam tv
महाराष्ट्र

काळ आला, पण वेळ नव्हती; भरधाव कार दोन वेळेस उलटूनही नगरचे कुटुंब सुखरूप

काळ आला, पण वेळ नव्हती; भरधाव कार दोन वेळेस उलटूनही नगरचे कुटुंब सुखरूप

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’, या उक्तीचा अनुभव नगर येथील चौधरी कुटुंबांला आला. सोनगीरपासून उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर मुंबई- आग्रा महामार्गावर गाय वाचविताना कारवरील नियंत्रण सुटून कारने दोन (Accident) पलटी घेतल्या. दैव बलवत्तर म्हणून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना १७ मेस सकाळी दहाच्या सुमारास घडली. (dhule accident news family of the town is safe even after the car overturned twice)

राजस्थानातील (Rajasthan) असलेला परिवार सध्या नगर येथे वास्तव्यास असलेले ठेकेदार शुभम चौधरी पत्नी व लहान मुलासह कारने (एमएच १२, एमबी ५७५७) राजस्थानहून (Ahmednagar) नगरकडे जात होते. सोनगीरजवळ अचानक महामार्गावर गाय धावत आली. तिला वाचविण्यात कारवरील नियंत्रण सुटले व कारने दोन पलट्या घेत दुभाजक ओलांडून विरुद्ध ट्रॅकवर उलटली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. विशेष म्हणजे दोन्ही ट्रॅकवर वाहन नव्हते, अन्यथा मोठा अपघात झाला असता.

शुद्धीवर आल्‍यावर परिवाराचे अश्रू अनावर

अपघाताची माहिती मिळताच जवळील अनेक जण मदतीला धावून आले. कारमध्ये अडकलेले शुभम चौधरी, त्यांची पत्नी हेमलता चौधरी व सहा वर्षांचा बालक आश्चर्यजनक रितीने वाचलेले दिसून आले. तिघांना सफाईदारपणे बाहेर काढून सोनगीर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. चौधरी दांपत्य किरकोळ जखमी झाले. बालकाला मात्र खरचटलेही नाही. शुभम चौधरी थोडा वेळ बेशुद्ध पडले होता. शुद्धीवर आल्यानंतर परिवाराला भेटून मोठ्याने रडू लागले. ‘काळ आला, पण वेळ नव्हती’ हे त्याला कळून चुकले होते. कारचे मात्र बरेच नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT