Maharashtra Politics Dharmveer Movie: Saamtv
महाराष्ट्र

Dharmveer 2: 'CM शिंदेंचा नवा डाव, ठाकरेंवर थेट घाव'! 'धर्मवीर २'मधून उद्धव ठाकरेंना डिवचणारे ५ मोठे डायलॉग

Dharmveer Movie CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. महत्वाच म्हणजे चित्रपटामध्ये हिंदुत्व, शिंदे गटाची बंडखोरी, याबाबत भाष्य करण्यात आले असून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. २१ जुलै २०२४

एकीकडे राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहू लागले असतानाच मराठी सिनेसृष्टीतील धर्मवीर चित्रपटावरुन आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर २' या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून चित्रपटात थेट उद्धव ठाकरेंवर टीका करणारे अनेक संवाद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

चित्रपटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. महत्वाच म्हणजे चित्रपटामध्ये हिंदुत्व, शिंदे गटाची बंडखोरी, याबाबत भाष्य करण्यात आले असून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात धर्मवीर चित्रपटावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना डिवचणारे ५ मोठे डायलॉग कोणते?

१. 'छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग, कुणाशी तरी 'आघाडी' करुन विकलात तो भगवा रंग'

२. 'सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी के फॅमिली का कुत्ता नही'

३. 'नेता घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो, म्हणून तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा'

४. '२० वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला'

५. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारुन हिंदुत्वाला मिठी मार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपनंतर शिवसेनेनं खातं उघडलं! जळगावात गौरव सोनवणे बिनविरोध

Viral : गर्लफ्रेंडसोबत नव्या वर्षाच्या पार्टीत दंग, बायकोनं रंगेहात पकडले, कारची काच फोडली अन्

Shocking: नवीन वर्षाचे स्वागत करताना बारमध्ये भीषण स्फोट, किंकाळ्या अन् आगीच्या ज्वाळा; अनेकांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Blood Pressure: कोणत्या वेळी BP अचानक वाढतो? डॉक्टरांनीच दिली माहिती, वेळीच व्हा सावध

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद, समोर आली अपडेट

SCROLL FOR NEXT