DHARMENDRA PRADHAN RESIGNS; CM DEVENDRA FADNAVIS ARRIVES IN DELHI AMID POLITICAL BUZZ saam tv
महाराष्ट्र

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पोहोचले, चर्चांना उधाण

Dharmendra Pradhan Resigns Fadnavis Delhi Visit: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून महत्त्वाच्या बैठकींची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आणि विद्यार्थी आंदोलनाला यश मिळाले असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे तरुणाईला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. 20 जुलैला जंतर-मंतरवर तरूणांवर विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक तरुण हे गंभीर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती वाढली. तसेच विरोधी पक्ष ही आक्रमक झाले होते. यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला.

यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेतले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आपल्या पत्नीसमवेत पांडुरंगाची महापूजा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस हे काहीवेळापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहेत. आषाढी वारीची शासकीय महापूजा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री सोलापूरमधून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत. शिंदे हे दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काहीवेळातच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांचा फोन आल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळेच देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही मोठी घडामोड घडणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanjivaram Paithani Saree: लग्नसमारंभ, कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग एकदा पाहाच या ७ सुंदर कांजीवरम पैठणी साड्या

Maharashtra News Live Update: नव्या पिढीला हाताळताना लाठीमार गरजेचा - शरद पवार

Jagannath Rath Yatra : जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी, मृतांची संख्या ४ वर; १०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षण मंत्री होणार; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा शिक्षणमंत्री कोण होणार? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT