Young Man Ends Life in Dharashiv Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv News: मराठा आरक्षणासाठी टोकाचा निर्णय, धाराशिवमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Young Man Ends Life in Dharashiv: मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहिली होती. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये २६ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली होती. या घटनेमुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या कळंब तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली आहे. २६ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश संजय लोमटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

योगेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. योगेशच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी सापडली. योगेश लोमटे हा उच्चशिक्षित असून गेल्या काही वर्षांपासून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्यामुळे तो चिंतेत होता. चिंतेत असलेल्या योगेशने आत्महत्या करत जीवन संपवलं. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT