धाराशिवच्या कळंबमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीचे अपहरण
हातात कोयता घेऊन घरात घुसून तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप
कळंबमध्ये तरुणीच्या आई आणि बहिणीला मारहाण केल्याची घटना
हा व्हिडिओ नीट पाहा, हातात कोयता आणि अर्धनग्न अस्वस्थेतील हा तरुण कुणी मनोरुग्ण नाही. तर एकतर्फी प्रेमातून तरुणीचं अपहरण करणारा आरोपी आहे. या तरूणाचं एकतर्फी प्रेम होतं.. तरुणी आपल्याला बधत नाही म्हटल्यावर हा तरूण हातात कोयता घेऊन आपल्या चार मित्रांसह थेट तिच्या घरात घुसला. घरात असलेल्या तरुणीच्या बहिणीला आणि आईला त्यानं बेदम मारहाण केली आणि नंतर एर्टिंगा गाडीतून तरूणीचं अपहरण केलं. वाटेत दोन जणांना गाडीनं उडवलं. हा अपहरणाचा सिनेस्टाईल थरार घडला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात.
पोलिसांनी या तरूणाचा पाठलाग सुरू केला आणि हा पाठलाग थेट आंबेजोगाईपर्यंत सुरू राहिला..तब्बल अर्ध्या तासांच्या पाठलागानंतर जेव्हा पोलीसांनी तरूणाला गाठलं तेव्हाही तरूणाच्या धमक्या सुरूच होत्या. झटापटीनंतर पोलिसांना तरूणाला ताब्यात घेतलं आणि पोलिसी हिसका दाखवल्यानंतर एकतर्फी प्रेमातून आपण हे अपहरण केल्याची त्यानं कबुली दिल
एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करणं आणि थेट पोलिसांसमोरच तरुणीला वेठीस धरण्याचा हा प्रकार चिंताजनक आहे. मुळात हातात कोयता घेऊन कुणाच्याही घरात घुसून अशी अपहरण करण्याची हिंमत येते कुठून...पोलीसांचा काहीच धाक वाटेनासा झाला आहे का. पोलिसांनी आता आरोपीला अटक केली असली तरी त्याच्या तीन फरार साथीदारांना गजाआड करून त्यांनाही कठोर शिक्षा होणंही गरजेच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.