Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : साथरोगांचा विळखा; डेंग्यू सदृश्य आजाराने उमरगा येथे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Dharashiv News : पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात डेंग्यू या साथरोगाचा उद्रेक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. डेंग्यूसोबतच मलेरिया, टायफाईड, चिकुनगुनिया या सारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव झपाट्याने होत असतो. यात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने पाय पसरले असून धाराशिवच्या उमरगा शहरात देखील डेंग्यूची साथ जोरात सुरु आहे. या दरम्यान डेंग्यू सदृश्य आजाराने मागील आठ दिवसांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उमरगा शहरातील सत्यजित हनुमंत देशमुख (वय १२) व ओम शिवाजी साळुंखे (वय १८) या दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात डेंग्यू या साथरोगाचा उद्रेक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. डेंग्यूसोबतच मलेरिया, टायफाईड, चिकुनगुनिया या सारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. यामुळे शहरातील जवळपास सर्वच दवाखाने गर्दीने भरलेले आहेत. 

औषध, धूर फवारणी नाही 

उमरगा शहरात नागरपालिकेच्यावतीने औषध आणि धूर फवारणी होत नसल्याने डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर नगरपालिकेने शहरांमध्ये स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील उमरगा शहरातील नागरिकांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT