Tuljapur Zoo Park Saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Zoo Park : तुळजापूरमध्ये उभारले जाणार प्राणी संग्रहालय; पंधरा दिवसात प्रक्रियेला होणार सुरवात

Dharashiv News : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच वेगवेगळ्या परवानग्या घेण्याचे काम देखील जलदगतीने करण्याचा प्रयत्न राहील

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वन विभागाच्या जागेत मराठवाड्यातील दुसरे प्राणीसंग्रहालय उभारले जाणार आहे. प्राणी संग्रहालयासाठी वन विभागाच्या जमिनीची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली असून पुढील पंधरा दिवसात यासाठीची प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे.  

मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात एक प्राणिसंग्रहालय आहे. यानंतर मराठवाड्यात आणखी एक प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. तुळजापूर येथे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत. प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची आमदार जगजितसिंह पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यासह पाहणी केल्यानंतर त्यांनी याबाबतची अधिकची माहिती माध्यमांशी बोलताना दिली. 

पंधरा दिवसात प्रक्रियेला सुरवात 

वन मंत्र्यांसोबत चर्चा देखील करण्यात आली आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या सर्व मान्यता घेऊन निधी उलपब्ध करून कामाला सुरवात केली जाणार आहे. तर पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच वेगवेगळ्या परवानग्या घेण्याचे काम देखील जलदगतीने करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. 

२० हेक्टर जागेवर उभारणार प्राणी संग्रहालय  

नवीन प्रकल्प येऊन रोजगार निर्मिती व्हावी आणि अर्थकारणाला बळकटी मिळावी या अनुषन्गाने हा प्रयत्न राहणार आहे. तुळजापूर परिसरात दोन ठिकाण असून ४० हेक्टर जागेपैकी २० हेक्टरवर प्राणी संग्रहालय केले जाणार आहे. तर २० हेक्टरवर वेगळे काही नियोजन करणार आहोत. याशिवाय बर्ड पार्क देखील उभारले जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urad Dal Recipe: नाश्त्याला बनवा उडीदाच्या डाळीचे खमंग, खुसखुशीत वडे, सर्वजण आवडीने खातील

Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

Leopard : ४ पाय कापलेले, १८ नखे गायब, ऊसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह, साताऱ्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Shocking: विद्यापीठात रक्तरंजित थरार! परीक्षेदरम्यान अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT